आमचं वास्तव्य दादर, शिवाजी पार्क भागात असल्याने आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या गर्भश्रीमंत होतो. शिवाजी मंदिरसारखं नाट्यगृह आणि प्लाझासारखं टॉकिज घरापासून हाकेच्या अंतरावर असल्याने लोकं शब्दशः जळायची आमच्यावर. पेपरातल्या जाहिराती वाचून बाबांना हस्त परहस्ते निरोप यायचे, अमूक नाटकाची शिवाजी मंदिरला तिकिटं काढून ठेवा किंवा अमक्या शो ची प्लाझाची तिकिटं काढून ठेवा. बाबा इमानेइतबारे त्यांची ही मागणी पुरी करायचे आणि मग मंडळी तिकिटं घ्यायच्या निमित्ताने आमच्या घरी येऊन पाहुणचार घेऊन नाटक सिनेमाला रवाना व्हायची. आम्हाला दोन्ही ठिकाणी लागणारी सगळीच नाटकं किंवा सिनेमे पाहणं जमत किंवा आर्थिकदृष्ट्या परवडत होतं असं नाही. पण बाबा अमिताभचे डायहार्ड फॅन आहेत. त्यामुळे कुठला सुपरहिट सिनेमा चुकलाय असं झालं नाही. त्याकाळी महिन्याच्या बजेटमधे मनोरंजनासाठी खास बेगमी केलेली असायची हे आता जाणवतंय. कारण जायचं तर फुल्टू धम्माल करूनच परतायचं हा अलिखित नियम होता आमच्याकडे. नाटकाला जाऊन शिवाजीमंदिरचे वडे न खाणं म्हणजे शंकराच्या देवळात जाऊन नंदीला नमस्कार न करता परतण्याएवढं महापाप होतं. आणि प्लाझाला सिनेमा पाहून मध्यरात्री घरी येता येता शिवाजीपार्कची कुल्फी खाणं अनिवार्य होतं.
त्याकाळी सगळेच सिनेमे सगळीकडे लागत नव्हते. मी अगदी लहान असताना मराठा मंदिरला मर्द आणि बहुतेक इरॉसला ब्युटिफुल पीपल नावाचा सिनेमा पाहिल्याचं अंधुकसं आठवतंय. एक्सलसिअरला होम अलोन दाखवायच्या निमित्ताने बाबांनी आम्हाला फोर्ट एरीयाशी ओळख करून दिली होती. बेस्ट बसमधून फिरत फिरत आम्ही तिकडे पोचलो होतो आणि मार्गात येणार्या प्रत्येक भागाची माहिती बाबा आम्हाला देत होते. होम अलोन पाहून झाल्यावर आम्ही फोर्टमधल्या सुविधात जाऊन तिथली अतिसुंदर कांचीपुरम इडली खाण्याचं पुण्यकर्म पार पाडलं होतं. बाबांना असलेली तिथल्या परीसराची, खादाडी ठिकाणांची अचाट माहिती बघून मला त्यावेळी एकदम 'माय डॅडी स्ट्राँगेस्ट!' फिलींग आलं होतं.
सेहवागची, बायकोचा बाहुबली पाहण्याचा हट्ट मोबाईलवर आयपीएल बघत पुरवल्याची बातमी वाचून मला अगदी 'देजावू' झालं. शिवाजी मंदिरला एकदा 'मोरूची मावशी' नाटक लागलं होतं. त्या नाटकाची तिकिटं तेव्हा सहजपणे मिळत नव्हती, शो ओपन झाला की लगेच संपून जायची. आमच्या कुटुंबातल्याच कोणीतरी जिवाची बाजी मारून १६ तिकिटं काढली. बायका-मुलं सगळी धरून १५ जण झाली. १६ वा कोणीतरी पुरुष पाठवणं गरजेचं होतं, कारण नाटक रात्रीचं होतं, वन्समोअर मिळत गाणी रंगली असती तर घरी परतायला मध्यरात्र उलटून गेली असती. मग हा नको, तो नको करत १६ वा नंबर बाबांचा लावायचा असं ठरलं. आमचे बाबा जाम तयार होईनात नाटकाला यायला, कारण तेव्हा भारताची क्रिकेट मॅच होती. ती मॅच सोडून मोरूची मावशीसारख्या थिल्लर नाटकला यायचं म्हणजे काय! पण त्यांचा नाईलाज झाला, त्यांनी नाटकाच्या २० रुपये तिकिटात रेडिओवर फुकट ऐकायला मिळणारी मॅच ऐकली :D अख्खं नाटकभर त्यांच्या कानाला पॉकेट ट्रान्झिस्टर लावलेला होता. मध्यंतरातही त्यांनी आपलं बूड हलवलं नाही. :P
आशूमुळे या सुरेख आठवणी चाळवल्या :-)