श्री टिळक यांचं ललित, बिनभांडवली धंदा
वाचलं आणि असे अनेक बिन भांडवली किंवा अल्प भांडवली आणि अवैध धंदे आठवू
लागले. त्यातलाच एक धंदा म्हणजे लोकलमधून 'विनातिकिट प्रवास'.
'विनातिकिट प्रवास' म्हणजे मुंबईच्या लोकलमधून, तिकिट न काढता अगदी प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करा आणि समजा तिकिट तपासनीसाने पकडलंच तर दंड भरा आणि दंड भरल्याची पावती दाखवून आमच्याकडून दंडाचे पैसे घेऊन जा ह्या स्वरूपाचा हा अगदी अल्प भांडवली धंदा.
तर, 'विनातिकिट प्रवास' करायचा असेल तर या संघटनेच्या सदस्यांना गाठायचं. तुम्ही कुठून कुठे प्रवास करणार ह्यावर वर्गणी शुल्क आधारलेले असते. एक फोटो देऊन ओळखपत्र आणि वर्गणी भरून पावती घ्यायची आणि बिनधास्त प्रथम वर्गाने महिनाभर विनातिकिट प्रवास करायचा. मासिक शुल्क भरून दर महिन्याला हा असा अल्प दरात प्रथम वर्गाचा प्रवास म्हणजे मुंबईकरांसाठी चैनच होते. समजा कुठल्या स्टेशनवर तपासनिसाने पकडलं तर रीतसर दंड भरून पावती घ्यायची आणि मग ह्या संघटनेच्या सदस्याला गाठून पावती दाखवून आपले दंडाचे पैसे वसूल करायचे.
बर्याच दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात ह्याबद्दल बातमी वाचली होती. पण त्यावर विश्वास बसला नव्हता. परंतु जेव्हा खुद्द मलाच ह्याचा अनुभव आला तेव्हा ह्या धंद्याने पसरलेले हात पाय बघून मी सर्दच झाले.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे पास काढण्यासाठी भरपूर मोठी रांग होती त्यामुळे पास मिळेपर्यंत चांगलाच उशीर झाला आणि माझी नेहमीची गाडी चुकली. पुढच्या गाडीत मैत्रीण भेटली, तिला मी हे सर्व सांगत असताना बाजूची मुलगी अगदी लक्षपूर्वक ऐकत होती. कुर्ल्याला जरा गर्दी ओसरल्यावर तिने मला गाठलं आणि कानात कुजबुजत ह्या संघटनेबद्दल माहिती दिली. माहिती रोचक वाटली म्हणून मी जरा जास्त खोलात जाऊन चौकशी केली. उदरनिर्वाहासाठी मुंबई आलेल्यांपैकी कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघालेली ही कल्पना यशस्वी झाली आहे. अतिशय खाजगी रीतीने चालणारा हा धंदा विमा तत्त्वावर आधारीत आहे. म्हणजे समजा १० लोक रेल्वेतून फुकट प्रवास करत असतील तर तिकिट तपासनीस फार तर ४ जणांना पकडू शकेल. बाकीचे ६ लोक विनासायास आपल्या कार्यस्थळी पोचतील.
असं समजा की मी ठाणे - सीएसटी या रूटसाठी तीन महिन्यांचा पास घेण्यासाठी ५९० रुपये भरते. समजा मी या संघटनेची सदस्य झाले तर मला याच रूटसाठी फक्त १२५ रुपये भरावे लागतील. म्हणजे दर महिन्याला ५९० रुपये मोजण्याऐवजी १२५ रुपयात काम भागेल. पण तिकिट न बाळगण्याबद्दलचा दंड भरण्यासाठी आवश्यक असलेले पैसे नेहमीच पर्समध्ये बाळगावे लागतील. बघा, काय करू? तुमचा सल्ला विचारतेय. घेऊ का सदस्यत्व ह्या संघटनेचं?

मूळ लेख आणि लेखावरच्या प्रतिक्रिया इथे वाचता येतील - http://www.maayboli.com/node/1223
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा